Improve the condition of Varur – Virur road, otherwise Chakkajam agitation
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम मागासलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरुर – विरुर मार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून,या मार्गावरील खड्ड्यामुळे कित्येक जनाचे अपघात होऊन बळी सुद्धा गेले आहे.
स्थानिक प्रशासन व बांधकाम विभागाला कित्येक मागणी करून अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. याची दखल अखेर विरूर क्षेत्र विकास समितिच्या पदाधिकाऱ्यांनी घेत जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच प्रशासनाला निवेदन दिले आहे. या निवेदनातून रस्त्याची तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास येत्या 3 एप्रिल ला वरुर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. Improve the condition of Varur – Virur road, otherwise Chakkajam agitation
मागील पंचवीस वर्षापासून जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर राजुरा विधानसभा क्षेत्रात काही भागात अजूनही दळणवळणाची व्यवस्था सुरळीत झाली नसुन वरुर – विरुर या मुख्यमार्गाचे काम केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्त्याच्या नूतनीकरण,रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, निरगट्ट प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाऊस पडला तर ठिकठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यात पाणी भरल्याने अपघात घडत असतात. यामुळे मार्गावरील प्रवास नरकयातनांचा झाला आहे. या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली असून समाजातील सर्व स्तरावरील नागरिक, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, ऑटो संघटना,तसेच परिसरातील संपूर्ण सरपंच संघटना, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, संचालक, ग्रामकोस समितीचे सर्व पेसा अध्यक्ष यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
रस्त्याची मागणी मान्य न झाल्यास 3 एप्रिलला वरुर फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.