Monday, May 25, 2026
HomeIndustrialमहावितरणची वीजबिल वसुली मोहिम जोरात

महावितरणची वीजबिल वसुली मोहिम जोरात

MSEDCL’s power bill recovery campaign in full swing

चंद्रपूर :- महावितरण चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातर्फे गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चालू विज देयके, थकित विज देयके भरण्याकरीता वीज बिल वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. सांघीक कार्यालयाकडून दिलेले लक्ष/उददीष्टे साध्य करण्याकरीता चंद्रपूर परिमंडळ अंतर्गत 2 प्रविभाग व 6 विभागीय कार्यालये आणि 29 उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व अधिकारी/कर्मचारी थकबाकी व चालू विज देयक भरणा करण्याकरिता वसुली मोहिम सतत राबवत असून वीज बिल वसुलीचे उददीष्टये गाठण्याकरीता मार्च महिन्यात वसुली मोहिम तीव्र करण्यात आलेली आहे. MSEDCL’s power bill recovery campaign in full swing
आर्थिक वर्ष संपायला आता शेवटचे पाच दिवसाचा कालावधी उरला आहे. या पाच दिवसांमध्ये महावितरणला गडचिरोली व चंद्रपूर मंडळातील जवळपास आर.सी.आय. ग्राहकांकडे 23 कोटी रुपयाची थकित व चालु वीज बिलाची वसुली करायची आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाने विशेष वीज बिल वसुली मोहिम सुरु केली आहे. वीज देयके न भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.>> देशी कट्टा, जिवंत काडतूस सह तिघे अटकेत
ज्या ग्राहकांकडे वीज बिल थकीत आहे अशा सर्व ग्राहकांना सर्वप्रथम फोन द्वारे माहिती दिली जात असुन त्यानंतरही वीज बिलाचा भरणा न केल्यास त्यांना प्रत्यक्ष भेटीद्वारे बिल भरणा करण्यास अवगत करण्यात येत आहे. वीज बिल मोहिमेस सहकार्य न करणाऱ्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे. तसेच महावितरणतर्फे वीज बिल वसुली मोहिम राबवितांना कार्यालयीन कामात व्यत्यय निर्माण होऊ नये याकरीता आवश्यकतेनुसार ठिकठिकाणी पोलीस संरक्षण सुध्दा घेण्यात येत आहे.> चंद्रपुरात 28 मार्च रोजी रोजगार मेळावा
ग्राहकांच्या सोई सुविधेकरीता तसेच महावितरणच्या वीज बिल मोहिमेच्या कारवाईमुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये याकरीता सार्वजनिक सुटटीच्या दिवशी म्हणजे शनिवार – रविवार देखील वीज बिल भरणा केंद्र, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सुटटीच्या दिवशी सुरु ठेवण्यात येत आहे. Bills can be paid at Msedcl’s center on public holidays
तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर व मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या कोठूनही वीज बिल भरणा करता येईल. वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही पासून ग्राहकांनी वंचित राहण्याकरीता चालु व थकित वीज बिलाचा मार्च-2025 अखेरीस सर्व वीज ग्राहकांना वीज देयकाचा नियमीत भरणा करावा असे आवाहन चंद्रपूर महावितरणचे मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी केलेले आहे
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular