20 boxes of illegal liquor seized from a four-wheeler in Ballarpur
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे दरम्यान बल्लारपूर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची मोहीम राबवित असताना एका चारचाकी वाहनातून 20 पेटी अवैध देशी दारू जप्त केली यात एकूण 17,0000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. illegal liquor seized from a four-wheeler in Ballarpur
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आचारसंहिता Code of Conduct दरम्यान अवैध व्यवसायांवर अंकुश राहावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता बल्लारपूर पोलिसांची धडक मोहीम सुरु आहे,
दरम्यान दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली Ballarpur Police Station यावरून बल्लारपूर पोलिसांनी सापळा रचून ह्युंदाई कंपनीची MH 34 K 5913 क्रमांकाचे वाहणाची झडती घेतली असता यात 20 पेटी अवैध देशी दारू आढळून आली यावर बल्लारपूर पोलिसांनी कारवाई करत 20 पेटी देशी दारू व ह्युंदाई चारचाकी वाहन असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गाडे यांच्या नेतृत्वात स.फौ. गजानन डोईफोडे, पोहवा पंकज शिंदे, राजू बगमारे, सचिन बुटले, सौरभ मून, स्वप्निल खोब्रागडे, प्रणय वानखेडे यांनी केली आहे.



