Thursday, January 15, 2026
HomeAccidentचंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर अलार्म निकामी

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर अलार्म निकामी

Fire alarm system at Chandrapur District General Hospital malfunctions

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पेशंटची होत असलेली गैरसोय नवीन विषय नाही. अशीच एक तक्रार एका पेशंटच्या नातेवाईकाची आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांचा कडे आली ते रुग्णालयाचे पाहणी करत असताना फायर च्या होस पाईपकडे त्यांची लक्ष गेले तर होस पाईपच्या बॉक्स मध्ये देशी दारूची बाटली आढळली तथा इमर्जन्सी अलार्म हे तिथून काढल्याचे निदर्शनास आले. Fire alarm system at Chandrapur District General Hospital malfunctions

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्नीतांडव घडले होते त्याची अनुभूती घेऊन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने फायर यंत्रणा सज्ज ठेवायला हवी होती परंतु त्याऊलट येथे Fire System फायर यंत्रणाचं निकामी असल्याचे निदर्शनास आले.

भविष्यात इमर्जन्सी कोणतीही दुर्घटना घडली किंवा शॉर्ट सर्किट सारखे अग्नितांडव झाले तर मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन फायर ची ऑडिट करून इमर्जन्सी अलार्म त्वरित लावण्यात यावे. अन्यथा कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा प्रशासन तथा जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार राहणार असतील असा इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular