Saturday, January 17, 2026
HomeCrimeचंद्रपुरात चारचाकी वाहनातून अवैध ड्रग्स तस्करी

चंद्रपुरात चारचाकी वाहनातून अवैध ड्रग्स तस्करी

Illegal drug smuggling in Chandrapur by four-wheeler

चंद्रपूर :- चारचाकी वाहनातून मेफोड्रोन ड्रग्स M.D. Drugs ची तस्करी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने LCB सापळा रचून रयतवारी परिसरात अटक करीत 23.46 ग्रॅम एम.डी. पावडर (मेफोड्रोन ड्रग्स) व चारचाकी वाहन असा एकूण 9,40,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Illegal drug smuggling in Chandrapur जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेणार नाही

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मादक पदार्थांची विक्री, सेवन व तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरु आहे, यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन अवस्थेकडे वळतांना दिसत आहे, हे समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी घातक आहे. पोलीस प्रशासनाने मादक पदार्थांच्या विक्री व सेवनावर कठोर कारवाई कारवाई करीत समाजाला व तरुण पिढीला सुदृढ ठेवायला पाहिजे अशी मागणी सामाजिक स्तरातून होत असतांना स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई प्रसंशनीय आहे. ChandrapurToday Crime ‘छावा’ कर मुक्त करा

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाला Chandrapur Local Crime Branch गोपनीय माहिती मिळाली की, शहरातील सिंधी कॉलनी येथील दिपक आसवानी आपल्या मारुती सुजूकी या चारचाकी वाहणाने इतर दोघांना घेऊन बगडखिडकी, रयतवारी परिसरात एम डी ड्रग्स विक्री करिता जाणार आहे, प्राप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रयतवारी येथील निमवाटिका परिसरात सापळा रचून दबा धरून बसून राहीले दरम्यान मारुती सुजूकी चारचाकी वाहन येतांना दिसताच वाहनाचा पाठलाग करीत वाहन थांबवून गाडीतील व्यक्तींची झडती घेतली असता त्यांचेजवळ 23.46 ग्रॅम एम डी (ड्रग्स) आढळून आले यावरून 23.46 ग्रॅम एम डी (ड्रग्स) किंमत 1,40,760 रुपये व मारुती सुजूकी कंपनीची कार एम.एच. 34 बी.व्ही. 4447 किंमत 8,00,000 रुपये मुद्देमाल जप्त करीत आरोपी मालू उर्फ नशीब आरिफ खान (28 वर्ष) रा. बगडखिडकी, चंद्रपूर, दिपक अशोककुमार आसवानी (32 वर्ष) रा. सिंधी कॉलनी, रामनगर व जमीर शाबीर शेख (22 वर्ष) रा. बगडखिडकी या तिघांविरुद्ध कलम 8 (क), 21 (ब), एन.डी.पी.एस. अन्वये रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Chandrapur Police तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न होणार साकार

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, सफौ. धनराज करकाडे, पोहवा. सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, पोशि प्रशांत नागोसे, किशोर वकाटे, अमोल सावे, शशांक बदामवार, दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular