“I was labeled a ‘villain’, but one day I will present the truth to the public”
चंद्रपूर :-“महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास टाकला. मात्र, सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन,” अशा शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. चंद्रपूर येथे खासदार धानोरकर यांच्या पुढाकाराने आयोजित काँग्रेस व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांच्या ‘स्नेहमिलन सोहळ्यात’ त्या बोलत होत्या. “I was labeled a ‘villain’, but one day I will present….
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ नेते सुभाष गौर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कुंदा जेणेकर, काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामंगे, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रदीप ऊर्फ पप्पू देशमुख, नगरसेवक वसंता देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार प्रतिभा धानोरकर पुढे म्हणाल्या की, “दिल्लीत काँग्रेस नेत्या खा. प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात.” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काँग्रेस ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांनी नगरसेवकांनी महापालिकेचे कामकाज समजून घेण्याचे आवाहन केले. “महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड दूर करण्यासाठी आपल्याला प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागेल,” असे त्यांनी नमूद केले. तर जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी खासदर प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना सांगितले की, “खासदारांच्या प्रभावी पुढाकारामुळेच काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या १२ वरून २७ पर्यंत पोहोचली आहे. भविष्यातही आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करू.” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण कोंड्रा यांनी केले.