Thursday, July 9, 2026
HomeElectionयुवक काँग्रेसमधूनच घडते सक्षम नेतृत्व

युवक काँग्रेसमधूनच घडते सक्षम नेतृत्व

Capable leadership emerges from the Youth Congress; young people should join the organization for the sake of public and national interest

चंद्रपूर :- युवक काँग्रेस ही केवळ राजकीय संघटना नसून देश आणि राज्याला सक्षम, अभ्यासू व जनतेशी बांधिलकी असलेले नेतृत्व घडविणारी प्रभावी संस्था आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांची राजकीय जडणघडण युवक काँग्रेसमधून झाली असून, सामान्य युवकांनाही नेतृत्वाची समान संधी देणारे हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. त्यामुळे जनहित व देशहितासाठी युवकांनी मोठ्या संख्येने युवक काँग्रेसच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय प्रभारी कपिल ढोके यांनी केले. Capable leadership emerges from the Youth Congress

तरुणांसाठी सुवर्णसंधी, पंतप्रधान इंटर्नशिप……….

चंद्रपूर येथे आयोजित चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या मासिक संघटनात्मक आढावा बैठकीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा इको प्रो फाउंडेशनचे संस्थापक बंडू धोत्रे होते. प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू अजय धोटे, सचिन उपरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी, शहर व तालुका अध्यक्ष, आघाडी संघटनांचे प्रतिनिधी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शंतनू अजय धोटे यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक युवकापर्यंत संघटना पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. युवक काँग्रेस ही जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणारी संघटना म्हणून अधिक सक्षमपणे उभी राहील. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर सातत्याने लोकशाही मार्गाने लढा उभारणे हीच युवक काँग्रेसची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मागील महिनाभरातील संघटनात्मक कामकाजाचा आढावाही सादर केला.

बैठकीचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि जनआंदोलनांमध्ये युवकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

सामाजिक प्रश्नांसोबतच पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांमध्येही युवकांनी पुढाकार घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत आगामी सदस्य नोंदणी अभियान, बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क अभियान, संघटन विस्तार तसेच स्थानिक प्रश्नांवर प्रभावी जनआंदोलने उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात जिल्हाभर युवक काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रशांत डवले यांनी केले, तर सचिन उपरे यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रे, तालुके, शहरे व विविध विभागांतील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular