Thursday, August 6, 2026
HomeCultural'हर घर तिरंगा' अभियानात चंद्रपूर जिल्हा पुन्हा राज्यात अग्रेसर

‘हर घर तिरंगा’ अभियानात चंद्रपूर जिल्हा पुन्हा राज्यात अग्रेसर

राष्ट्राभिमानाचे प्रतीक असलेला तिरंगा प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवूया ; आ. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हावासीयांना आवाहन

चंद्रपूर :- देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला यंदाही चंद्रपूर जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळावे, या उद्देशाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी एक लाख तिरंगा ध्वज उपलब्ध करून त्यांचे जिल्हाभर नियोजनबद्ध वितरण करण्यात यावे, जेणेकरून प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्याने यापूर्वीप्रमाणेच यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियानात राज्यात अग्रस्थानी राहून राष्ट्रभक्तीचा नवा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पत्रात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा या अभियानात राज्यात अग्रस्थानी राहिला असून, यंदाही हा मान कायम राखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच व्यापक नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी एक लाख तिरंगा ध्वज उपलब्ध करून ते नागरिकांना प्रत्येकी २५ रुपयांच्या दराने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच ९ ते १७ ऑगस्ट या अभियान कालावधीत प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचेल, यासाठी प्रभावी नियोजन व जनजागृती करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रभक्ती, जनसहभाग आणि संघटित प्रयत्नांच्या बळावर यंदाही ‘हर घर तिरंगा’ अभियानात राज्यात अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हावासीयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रप्रेमाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular