Thursday, August 6, 2026
HomeEducationalराजुरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आत्महत्याग्रस्त NEET विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

राजुरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आत्महत्याग्रस्त NEET विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

चंद्रपूर :- राजुरा नगर परिषद येथे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेची सर्वसाधारण सभा उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक रमेश नळे यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार NEET परीक्षेप्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. Tribute paid to NEET students who died by suicide

यावेळी नगर परिषद परिसरात दिवंगत माजी नगराध्यक्ष श्रीमती मलिक्का स्वामी येरोलवार आणि मंगला महादेव आत्राम यांच्या प्रतिमांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नगर परिषदेच्या विकासात व जनसेवेत त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

याच कार्यक्रमात नगर परिषदेतील प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या दिनकर रागीट व रमेश बावणे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी नगराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. Rajura Municipal Council’s general body meeting

कार्यक्रमाला नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, उपनगराध्यक्ष दिलीप डेरकर, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, महादेव आत्राम, मुख्याधिकारी विवेक चौधरी, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, सभापती अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावळे, गीताताई पथाडे, अन्नुताई हरजीतसिंग संधु, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, संध्या चांदेकर, इंदुबाई निकोडे, भुपेश मेश्राम, स्वप्नील पहानपटे, प्रफुल कावळे, ईश्वर ठाकरे, मयुरी पहानपटे, पोर्णिमा सोयाम, फरीना सय्यद, एजाज अहमद, किशोर हिंगणे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते.

सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, नागरिकांशी संबंधित प्रश्न तसेच नगर परिषदेच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular