Fishermen of Chandrapur will get modern facilities
चंद्रपूर :- प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत अत्याधुनिक मच्छी मार्केट उभारण्याच्या दृष्टीने MNC मनपा प्रशासनाने जलद कार्यवाही करावी हे मार्केट केवळ व्यवसायाच्या दृष्टीनेच नव्हे, तर स्वच्छता, सुविधा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. यातून चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसायीकांना आधुनिक सुविधा मिळणार असुन या कामात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहे. Fishermen of Chandrapur will get modern facilities
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छी मार्केट उभारणी संदर्भात महानगरपालिका येथे बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रस्तावीत मच्छी मार्केट च्या कामाचा आढावा घेतला असून आवश्यक सुचना केल्या आहे. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, शहर अभियंता विजय बोरीकर, शाखा अभियंता नरेंद्र पवार, भारतीय जनता पार्टीचे मनोज पाल, विश्वजित शहा, अमोल शेंडे, आदींची उपस्थिती होती.
या प्रकल्पांतर्गत स्वच्छ, आधुनिक आणि सुसज्ज मच्छी मार्केट उभारण्यावर भर दिला गेला आहे. मत्स्यव्यवसायिकांना उत्तम पायाभूत सुविधा मिळाव्यात, तसेच स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक मत्स्यव्यवसायिकांना अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल आणि ग्राहकांनाही स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात येथे खरेदी करता येणार आहे.
मत्स्य व्यवसायिकांना शीतगृह, पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा यांसारख्या सुविधा व्यवस्थित मिळाव्यात. विक्रेत्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि हा व्यवसाय अधिकाधिक लोकांसाठी रोजगार निर्मिती करणारा ठरावा, ही आमची भूमिका असून प्रशासनाने या कामाच्या गतीला प्राधान्य द्यावे आणि अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी हा प्रकल्प म्हणजे केवळ मच्छी बाजार नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि चंद्रपूरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारा उपक्रम असल्याचे या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून सर्व विभागानी समन्वय ठवेत हे काम वेळेत पूर्ण करत उत्तम दर्जाचे करण्याच्या सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला केल्या आहे.
या बैठकीत संबधित विभागाच्या अधिका-यांची आणि मच्छी विक्रेत्यांची उपस्थिती होती.