Firing at Congress city president Raju Reddys house
चंद्रपूर :- घुग्गुस काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांचे निवासस्थानी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज 9 मार्च रोजी रात्रो 8 वाजताच्या घडली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. याघटने नंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेस पक्षाचे घुग्गुस शहराध्यक्ष घुग्गुस शहरातील तुकडोजी महाराज वार्डात वास्तव्यास असून ते घरात असतांना आज दिनांक 9 मार्च रोजी रात्रो 8 वाजता अज्ञातानी त्यांच्या घराच्या माळ्यावर गोळीबार केला, माळ्यावर भाड्याने दिले असल्यामुळे भाडेकरू यांना बंदुकीचा आवाज आल्यामुळे बाहेर निघाले असता बंदुकीचे काडतूस आढळून आले. राजू रेड्डी यांनी बाहेर बघितले असता आरोपी पसार झाले होते.
घुग्गुस पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला, घटनास्थळी पोलिसांना बंदुकीची गोळी (काडतूस) आढळून आला आहे. Increasing crime in Chandrapur
घटनेची माहिती मिळताच राजू रेड्डी यांचे समर्थकांचा जमाव त्यांचे घरी जमा झाला, तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.



