Saturday, May 23, 2026
HomeEducationalइन्फंट काँन्व्हेंट येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

इन्फंट काँन्व्हेंट येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

The emotional farewell ceremony of the 10th grade students at Infant Convent concluded with enthusiasm

चंद्रपूर :– इन्फंट जीजस सोसायटीद्वारे संचालित इन्फंट जिजस हायस्कूल राजुरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व नियोजनबद्ध पद्धतीने केले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण सभागृहात आनंद व भावनांचा संगम अनुभवायला मिळाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, कल्याणी धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. Emotional farewell ceremony of the 10th

काँग्रेस तोंडघशी,… महापौर भाजपचा

कार्यक्रमादरम्यान इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. मित्र- मैत्रिणींसोबत घालवलेले क्षण, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांतील सहभाग यांचा उल्लेख करताना अनेकांचे डोळे पाणावले. या सोहळ्यात नृत्य, गीत, मनोरंजनात्मक खेळ आणि प्रभावी भाषणांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्यूहरचना -हंसराज अहीर

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रामाणिकपणे मेहनत करून यश संपादन करा आणि शाळेचे तसेच आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करा असा संदेश त्यांनी दिला.

विश्वास आणि विकासाच्या सूत्रावर महापौर विराजमान

कार्यक्रमाच्या शेवटी दहावीच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शुभेच्छा संदेश देऊन भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कु. नंदिनी भेलवा, कु. संस्कृती वासेकर, कु. श्रेया वाढई, सम्यक रायपुरे, वत्सल उपरे, विराजसिंग धारिवार आणि अयान शेख यांनी केले. तर कु. महेरीन कुरेशी हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. संपूर्ण सोहळा आनंद, उत्साह आणि भावनिक क्षणांनी अविस्मरणीय ठरला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular