Establish an open garden and gym at the old vegetable market at Nanda Phata
प्रमोद खिरटकर
कोरपना तालुका प्रतिनिधी
कोरपना :- नांदा फाटा येथील जुना मार्केट परिसरातील नागरिकांनी त्या भागात ओपन गार्डन व व्यायामशाळा (जिम) उभारण्याची जोरदार मागणी भा.ज .पा. महामंत्री रवीकुमार बंडीवार यांनी केली आहे. सार्वजनिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी या उद्देशाने नागरिकांनी ग्राम पंचायत नांदा यांना निवेदनाद्वारे ही मागणी केली. Establish an open garden and gym
या परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी असून त्यांना सकाळी – संध्याकाळी फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी तसेच मुलांना खेळण्यासाठी मोकळ्या जागेचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. “परिसरातील लहान मुले, महिलावर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ व हरित परिसराची गरज आहे,” असे नागरिकांनी सांगितले.
या निवेदनात त्यांनी सांगितले की, “नांदा फाटा, जुना मार्केट परिसरात असलेल्या शासकीय जागेचा उपयोग करून या ठिकाणी ओपन गार्डन आणि व्यायामशाळा उभारण्यात यावी. त्यामुळे नागरिकांना सकस जीवनशैली अवलंबता येईल.”
या मागणीची योग्य दखल घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
