Thursday, October 15, 2026
HomeCulturalपालखी सोहळ्याने  श्री माता महाकाली महोत्सवाचा भक्तिमय शुभारंभ

पालखी सोहळ्याने  श्री माता महाकाली महोत्सवाचा भक्तिमय शुभारंभ

चंद्रपूर :- चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री माता महाकालीच्या महोत्सवाला आज गुरुवारी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. एकोरी वार्डातील एकविरा माता मंदिर येथून निघालेल्या माता महाकालीच्या पालखी सोहळ्यात श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी सपत्नीक सहभागी होत मातेचे दर्शन घेतले. राजमाता निवासस्थान, जैन मंदिर मार्गे माता महाकाली मंदिरात दाखल झालेल्या पालखी रथाचे महोत्सवाच्या मंडपात आगमन झाले. त्यानंतर माता महाकालीच्या उत्सवातील चांदीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. धार्मिक परंपरा, भक्तिभाव आणि सामाजिक उपक्रमांचा संगम साधत आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा प्रारंभ उत्साहात झाला. Shri Mata Mahakali Festival began on a devotional note with a palkhi

   यावेळी मनिष महाराज, कल्यानी किशोर जोरगेवार, श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे संजय बुरघाटे, राजु शास्त्रकार, मिलिंद गंपावार, पवन सराफ, प्रभाकर मंत्री, प्रसाद जोरगेवार, श्याम धोपटे, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, सविता दंढारे, वंदना हातगावकर आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    एकोरी वार्डातील एकविरा माता मंदिर येथून सकाळी निघालेली माता महाकालीची पालखी शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहोचली. त्यानंतर जैन मंदिर मार्गे पालखी रथ माता महाकाली मंदिरात दाखल झाला. तेथून रथ महोत्सवाच्या मंडपात आणण्यात आला. यावेळी धार्मिक विधी पार पडल्यानंतर माता महाकालीच्या उत्सवातील चांदीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

  महोत्सवाच्या प्रारंभप्रसंगी बंगाली समाज बांधवांनी पारंपरिक धुनी नृत्य सादर करत माता महाकालीचा जागर केला. भक्ती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ घडविणार्या या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांनी या धार्मिक सोहळ्यात सहभाग नोंदवत चंद्रपूरच्या श्रद्धास्थानाशी जोडलेल्या परंपरेला उजाळा दिला.

३४ नवजात कन्यांना चांदीची नाणी भेट

श्री माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने नवरात्रोत्सवादरम्यान जन्माला आलेल्या ३४ कन्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते चांदीची नाणी भेट देण्यात आली. कन्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासोबतच मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यांच्या सन्मानाचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने नवजात कन्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम महोत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.

आरोग्य शिबिराचे उद्घाटन

महोत्सव समितीच्या वतीने डॉ. आसावरी देवतळे यांच्या सहकार्याने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धेसोबतच समाजाच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम राबविण्याचा महोत्सव समितीचा प्रयत्न या माध्यमातून पुढे आला.

श्री माता महाकाली महोत्सव हा चंद्रपूरकरांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या महोत्सवाच्या प्रारंभी आमदार किशोर जोरगेवार यांनी पालखी सोहळ्यात सहभाग, नवजात कन्यांचा सन्मान आणि आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक उपक्रमांना उपस्थिती दिली. भक्तिभावासोबत समाजोपयोगी उपक्रमांची जोड देत श्री माता महाकाली महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular