Election of Babytai Uike as District Working President of Chandrapur District Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar).
चंद्रपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP Sharadchandra Pawar शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विदर्भाचे नेते माजी.गृहमंत्री अनिलबाबू देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्या आजारपणामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आरामाची गरज असल्यामुळे जिल्ह्याची जबाबदारी इतर कोणाकडे देणे आवश्यक होते, त्यानुसार चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके यांचे कार्य आणि पक्ष संघटन वाढीकरता दिलेल्या योगदानाबद्दल वरिष्ठ नेत्यांनी विश्वास टाकीत चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांची वरिष्ठांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली. Election of Babytai Uike as District Working President of NCP Chandrapur
कार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार आणि माजी गृहमंत्री श्री अनिलबाबू देशमुख यांच्या हस्ते नागपूर येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये देण्यात आले.
बेबीताईं उईके यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीकरिता निश्चितच गती मिळेल अशी आशा पक्षातील कार्यकर्त्यामध्ये पल्लवीत झाली आहे.
यावेळेस शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल, युवक जिल्हाध्यक्ष सुमित समर्थ, प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकुर, युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्हारप, वरोरा तालुका अध्यक्ष अविनाश ढेगडे, भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राजू वर्गणे, नगाजी निंबाळकर, अरुण सहारे, माजी नगरसेवक विनोद लभाने, मारोती झाडे, परब गीरडकर, वरोरा तालुका अध्यक्ष सुशीला तेलमोरे, मुल शहराध्यक्ष अर्चना चावरे, वरोरा शहर बल्लारपूर शहर कार्याध्यक्ष शहजादी अन्सारी, वरोरा शहर कार्याध्यक्ष मोनाली काकडे, छायाताई चौधरी, अर्चना वाटकर, माजी ग्रामपंचायत सदस्य ऊर्जानगर किसन आरदळे, प्रवीण आरपेल्ली, राहुल मोहुर्ले प्रामुख्याने उपस्थित होते.