Repair potholed roads
Loud mass movement of MNS
चंद्रपूर :- शहरात घरोघरी पाणी पोहोचावे यासाठी अमृत योजनेअंतर्गत नळ योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत घरोघरी नळ पोचविण्यासाठी कंत्राटदाराकडून मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यांची तोडफोड करण्यात आली यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झालेत यातच बागला चौक ते लालपेठ व माता नगर रोड खड्ड्याने बनल्या लगत झाला या विरोधात MNS मनसे रोजगार व स्वयंम रोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वात रोडवरील खड्ड्याजवळ खळखड्याळ आंदोलन करण्यात आले. मनसे चे खड्ड्यात खळखड्याळ आंदोलन
अमृत नळ योजनेच्या कंत्राटदाराने नळ जोडणी करण्याच्या नादात रस्त्याचे खोदकाम केले यामुळे रस्त्यावर खड्डे तयार झालेत, रस्त्यावर पडलेले खड्डे पूर्ववत बुजवायला हवे होते परंतु ते बुजविण्यात आले नाही. मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी, अभियंत्यांनी याकडे आर्थिक पूर्ण दुर्लक्ष केले त्यामुळे आजही शहरातील अनेक भागात अमृत योजनेअंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे जैसे थे आहेत. Repair potholed roads
चंद्रपूर शहरातील आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या परिसरात ही स्थिती आहे. अंचलेश्वर गेट ते बल्लारशा रोड तसेच जुना बेनार स्टेशन ते माता नगर लालपेठ या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे जसेच्या तसे पडले आहेत. अंचलेश्वर गेट ते बल्लारपूर हा मार्ग वर्दळीच्या मार्ग असून या ठिकाणी शालेय विद्याथी, महाकाली मंदिरात दर्शननासाठी येणारे भाविक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत, यात जीवितहानी सुद्धा होऊ शकते त्वरित या रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी व दोषींवर कायदेशीर दंड ठोठावण्यात यावे. त्याचप्रमाणे जुने बेणार स्टेशन ते मातानगर – लालपेठ या रस्त्यावरही अमृत योजनेअंतर्गत खोदलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. जुना बेणार स्टेशन ते माता नगर ही घनदाट वस्ती असून या ठिकाणी मजूर तसेच मध्यम वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु मागील तीन वर्षापासून अमृत योजनेमुळे खोदलेल्या खड्ड्यांकडे संबंधित अधिकारी अभियंत्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे तरी त्वरित या मार्गावरील खड्यांना बुजवून रस्ता पूर्ववत करण्यात यावा यासाठी मनपा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मनसे स्टाईलने खळखट्याळ जनआंदोलन करण्यात आले. Loud mass movement of MNS
मनपा विरोधात नारेबाजी करत रस्त्यावरील खड्ड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार व स्वयंमरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष वर्षाताई भोमले, शालू ताई चौधरी, मनीषा ढोरे, बल्लारपूर विधानसभा उपाध्यक्ष राजेश वर्मा, शहर संघटक संदीप पटेल, विभाग संघटक संजय चौटवे, अर्जुन खोब्रागडे, पप्पू तिरुपती पंजवर यांची उपस्थिती होती.