Saturday, January 17, 2026
HomeMaharashtraडिजिटल मीडिया पत्रकार संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे

डिजिटल मीडिया पत्रकार संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे

Digital Media Journalist Association Chandrapur District President post Munna Tawade

चंद्रपूर :- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे यांची आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना या राज्यपातळीवरील संघटनेची पहिलीच बैठक आज दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. Digital Media Journalist Association

डिजिटल मीडियातील पत्रकारांवर होणारा अन्याय व पिळवणूक यावर आवाज उठवून न्याय मिळविण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी यावेळी विषद केले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची प्रमुख उपस्थिती होती तर इक्बाल शेख, अय्युब शेख उपस्थित होते यावेळी संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते मुन्ना तावाडे यांची नियुक्ती करीत मान्यवरांच्या हस्ते मुन्ना तावाडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या बैठकीत सिंदेवाही, मूल, कोरपणा तालुक्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

यावेळी गौतम गेडाम, धर्मपाल कांबळे, प्रशांत रामटेके आदी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular