Saturday, January 24, 2026
HomeEducationalमराठी भाषा गौरव दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा समूहगीत स्पर्धेचे आयोजन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा समूहगीत स्पर्धेचे आयोजन

Organization of Marathi language group song competition for school students on the occasion of Marathi Language Pride Day

चंद्रपूर :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त निमित्त दिनांक 28 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता शिवाजी महाविद्यालय सभागृह मध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 15 शाळा सहभागी झाल्या असून दीडशे विद्यार्थी मराठी भाषेतून समूहगीत सादर करणार आहेत. Marathi Language Pride Day

या कार्यक्रमाचे आयोजक स्वरप्रीतीचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते व आरोही सुगम संगीत विद्यालयाच्या केंद्रप्रमुख व संयोजिका अलका दिलीप सदावर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे

सहभागी शाळा स्टेला मॉरिस कॉन्व्हेंट इन्फट जीजस पब्लिक स्कूल, बाल संगीत विद्यालय बल्लारशा न्यू एरा इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चुनाळा, झाकीर हुसेन नगरपरिषद किडझी स्कूल, आदर्श विद्यालय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती, आशादेवी धोटे प्राथमिक शाळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चिंचोली शाळा, आदर्श प्राथमिक शाळा, ब्ल्यू डायमंड स्कूल राजुरा, ऑरचीड स्कूल राजुरा, शिवाजी विद्यालय राजुरा अशा पंधरा शाळांनी सहभाग घेतला आहे. Marathi language group song competition for school students

ही स्पर्धा निशुल्क असून सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र, प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहन पर असे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

या स्पर्धेकरिता सहआयोजक म्हणून स्वर प्रीतीचे संदीप कोंडेकार, स्वतंत्र कुमार शुक्ला, छोटूलाल सोमलकर, सुनील रामटेके, स्वरूपा झंवर, अनुष्का रेच, विना देशकर, लता कुळमेथे व सर्व सदस्यगण आरोही सुगम संगीत विद्यालय राजुरा हे आहेत.

कार्यक्रमाला उपस्थित राहून बालकलाकारांचे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनोबल वाढवावे अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular