Saturday, January 17, 2026
HomeAcb Trapघरकुलाची रक्कम देण्यास 20 हजारांच्या लाचेची मागणी

घरकुलाची रक्कम देण्यास 20 हजारांच्या लाचेची मागणी

Demand for a bribe of 20 thousand to pay the amount of Gharkul Yojana

चंद्रपूर :- सावली तालुक्यातील लोंढोलीतील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने रक्कम देयके देतांना 20 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ACB Trap

सावली तालुक्यातील लोंढोली येथील रहिवासी यांच्या वडिलांचे नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले, या योजनेतील सर्व प्रशासकीय कामे मौजा लोंढोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके हे हाताळीत होते दरम्यान पहिला हप्ता 15000 रुपयांचा, दुसरा हप्त्या 1,20,000 रुपयांची रक्कम अदा करण्यात आली परंतु तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी ग्रामसेवक रामटेके यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. Demand for a bribe of 20 thousand to pay the amount of Gharkul Scheme

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सापळा रचला दरम्यान ग्रामसेवक रामटेके यांनी तडजोडीअंती पहिले 10,000 व नंतर 10,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून सापळ्या दरम्यान तक्रारदाराकडून ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांनी 10,000 रुपयांची लाच स्वीकारली यावरून ग्रामसेवक रामटेके विरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे, चा.पो.अं. संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर च्या वतीने करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular