Diesel smuggling from pickup vehicle, goods worth Rs 6,16,500 seized along with pickup truck
चंद्रपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याभरात पोलिसांची विशेष मोहीम सुरु आहे, दरम्यान बल्लारपूर पोलिसांनी अवैध डिझेल विक्री करणाऱ्या तस्करावर कारवाई करीत पिकअप वाहनातील 38 कॅन जप्त करीत 6,16,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Diesel smuggling from pickup vehicle
दिनांक 8 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर पोलिसांना गोपनीय खबर मिळाली कि राजुरा मार्गे बल्लारपूरात येणाऱ्या पिकअप वाहनातून अवैध तस्करी सुरु आहे यावरून बल्लारपूर पोलिसांनी नाकाबंदी करीत पिकअप वाहन क्र MH 34 बी झेड 4818 ची तपासणी केली असता वाहणात अवैध डिझेल भरलेले 38 कॅन आढळून आले यावरून बल्लारपूर पोलिसांनी विचारपूस केली असता योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करत 38 पेटी डिझेल अंदाजित किंमत 1,16,000 रुपये व चारचाकी पिकअप वाहन 5,00000 रुपये असा एकूण 6,16,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यात वाहनचालक विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेण्यात आले आहे. Chandrapur Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक बल्लारपूर यांनी केली.