Saturday, January 18, 2025
HomeAssembly Electionपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा

Prime Minister Narendra Modi’s visit :: Changes in traffic system in Chimur

चंद्रपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर रोजी चिमुर येथे आयोजित सभेनिमित्त होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता महाराष्ट्र पोलिस अधिनियम-1951 च्या कलम-33(1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत भिसी ते पिंपळनेरीपर्यंत व जांभुळघाट ते आर.टी.एम कॉलेज, चिमुरपर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहनांना चिमुर जाण्यासाठी आर.टी.एम कॉलेज-नेरी रोड मार्गे चिमुर बायपास मार्गे चिमुर शहरात जाता येईल. त्याचप्रमाणे नेरी ते आर.टी.एम कॉलेज चिमुर पर्यंत सर्व प्रकारची जड वाहतूक बंद राहील. इतर वाहने नेरी-चिमुर बायपास मार्गाने चिमुर शहरात जातील व बायपास मार्गेच बाहेर पडतील.

त्याचप्रमाणे हजारे पेट्रोलपंप ते आर.टी.एम कॉलेज पर्यंत, हजारे पेट्रोलपंप ते संविधान चौक चिमुर वडाळा पैकु पर्यंत व हजारे पेट्रोलपंप ते नेहरू चौक चिमुर पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. तसेच वरोराकडून चिमुर शहरात जाण्यासाठी हलक्या वाहनांना नेहरू चौक या मार्गाचा अवलंब करता येईल. या सर्व मार्गांवर सभेकरीता येणाऱ्या वाहनांना प्रवेश राहणार असून आवश्यकतेनुसार सदर कालावधीत ठराविक वेळेकरीता सर्व प्रकारची वाहतुक बंद करण्यात येणार आहे.

या कालावधीत अवजड वाहतुकदारांना पुढील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.1. भिसी ते चिमुर-वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 2.जांभुळघाट ते चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर जाण्यासाठी भिसी-कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 3.नेरी वरून चिमुर किंवा वरोरा-चंद्रपुर-भिसीला जाण्यासाठी जाण्यासाठी जांभुळघाट भिसी- कन्हाळगांव-महालगांव-तिरपुरा-गदगांव या रोडचा अवलंब करावा. 4.वरोरा कडुन भिसी-जांभुळघाटला जाण्यासाठी गदगाव-तिरपुरा-महालगांव-कन्हाळगांव या मार्गाचा अवलंब करावा.

गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये याकरिता सर्व प्रकारच्या वाहतुकदारांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशात नमुद आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular