Vidarbha level matrimonial introduction conference and civil felicitation ceremony
चंद्रपूर :- आदिवासी समुदायाला एकत्र आणून समाजाला एकसंघ बनवण्याच्या उद्देशाने संयुक्त आदिवासी कृती समिती च्या वतीने 1 मार्च 2025 रोजी नागपूर रोडवरील शंकुतला फार्म्स येथे विदर्भ स्तरावरील आदिवासी युवा वैवाहिक परिचय परिषद आणि नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त आदिवासी कृती समितीचे जितेश कुलमेथे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात आदिवासींची संख्या जास्त आहे. तेथील गरिबीमुळे आदिवासींना त्यांच्या मुला – मुलींचे लग्न करने सामाजिक व आर्थिकदृष्टया कठीण होत चालले आहे. ज्यामुळे मुले आणि मुली शोधण्यात कष्ट, पैसा आणि वेळ वाया जात आहे. हे लक्षात घेऊन आणि आदिवासी समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही परिचय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिचय परिषदेचे उद्घाटन 1 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह राजुराचे सामाजिक विचारवंत बापूराव मडावी उपस्थित राहणार आहेत.
परिचय परिषदेसाठी मुला – मुलींची नोंदणी मोफत ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान आदिवासींच्या समस्या पालकमंत्र्यांसमोर ठेवल्या जातील. याचदरम्यान सर्व आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांचा नागरी सत्कार करण्यात येईल. Organizing Tribal Action Committee
संयुक्त आदिवासी कृती समितीने सर्व आदिवासी समाजातील सदस्यांना परिचय परिषदेत आणि पालकमंत्री नागरी सत्कार यांच्या समारंभात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत जितेश कुलमेथे, डॉ. देव कन्नाके, प्रा. नामदेव कन्नाके, सुनील गेडाम, प्रमोद बोरीकर, माया पेंडोर, रंजना कन्नाके उपस्थित होते.



