Deadly business of ‘selling drugs’ in Chandrapur
चंद्रपूर :- शहरातील कोनेरी तलाव भागात एम डी (ड्रग्स) विक्री करण्यासाठी आणणाऱ्या युवकास चंद्रपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेत 9.40 ग्रॅम एम डी (मॅफेडोन ड्रग्स) जप्त करीत त्याचा म्होरक्या असा दोघांना अटक करीत एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ChandrapurToday Crime
चंद्रपूर शहरातील दादमहाल वार्डातील कोनेरी तलाव परिसरात एक इसम मादक पदार्थाची विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोउपनि संदिप बच्छिरे यांना प्राप्त झाली यावरून पोउपनि बच्छीरे यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षकांना दिली दरम्यान पोलीस पथकाने कोनेरी तलाव परिसरात सापळा रचून एका युवकास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याचे पॅन्ट च्या खिशात प्रेसलॉक पन्नी मध्ये पांढऱ्या रंगाचा पावडर आढळून आला, युवकाची कसून चौकशी केली असता एम.डी. (ड्रग्स) असल्याची कबुली दिली. यावरून आरोपी अमान न्यायत खान पठाण (24 वर्ष) रा. बाबानगर, बाबुपेठ चंद्रपूर याला अटक करून त्याचे जवळील 9.40 ग्रॅम एम डी (मॅफेडोन ड्रग्स) किंमत 30,000 रुपये मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा असा एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Deadly business of ‘selling drugs’ in Chandrapur
पोलीसांनी आरोपीला अंमली पदार्थांबाबत अधिक विचारपूस केली असता सदर ड्रग्स आवेश कुरेशी नामक व्यक्ती विक्रीकरिता देत असून प्रत्येक पुडी मागे 200 रुपये याप्रमाणे कमिशन देत असल्याचे सांगितले दरम्यान पोलीस पथकाने आवेश शब्बीर कुरेशी (38 वर्ष) रा. भंगाराम वार्ड, चंद्रपूर अश्या दोघांना एन.डी.पी.एस कायद्या अन्वये अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन पो.नि. प्रभावती एकुरके, पोउपनि. संदिप बच्छीरे, पो.हवा. सचिन बोरकर, संतोष कनकम, भावना रामटेके, कपुरचंद खरवार, इम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश विताडे, विक्रम मेश्राम, सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली.
पुढील तपास सपोनि पंकज बसाने करीत आहेत.



