Virur city was buzzing with various activities in Shivagarjana
चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ व मॉर्निंग वॉकिंग क्लब यांच्या वतीने राजुरा तालुक्यातील विरुर नगरीत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक नव-नवीन स्वरूपात देखणी सुंदर अशी सजावट करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मंडळाचे अध्यक्ष तुषार मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देत शिवगर्जना करीत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले .
छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मॉर्निंग वॉकिंग क्लब च्या वतीने पालखी करिता विद्यार्थी व महिलांनी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात महाराजा बद्दल चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक नृत्य, लेझीम नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल वेशभूषा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यासह मोठ्या संख्येनी महिलांनी सुद्धा सहभाग घेत आपापल्या कलागुणाची प्रस्तुती करून उपस्थित यांची मने जिंकली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून बापू धोटे व धरनेवार मॅडम यांनी परीक्षण करून मिरवणूक समाप्तीनंतर सर्व विजेत्या स्पर्धकांना शील्ड व सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच अनिल आलम, उपसरपंच प्रीतीताई पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष अविनाश रामटेके, ग्रामकोश समिती अध्यक्ष भास्कर सिडाम,ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाला, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सरिताताई रेड्डी यासह आधी गावातील युवा तरुण युवती महिला व नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



