Inter-Division Cricket Tournament organized by Omat West Limited concluded
चंद्रपूर :- विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेल्या ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या व्यवस्थापनाच्या वतीने आपल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट क्रिडा स्पर्धेचे आयोजन दि. ७ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत स्थानिक मोरवा येथील पटांगणावर केले होते.
कामाव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना विशेष सवड मिळत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील सुप्त गुणांना वाव मिळत अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक वृद्धिंगत व्हावा या करिता या क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ओमॅट वेस्ट लिमि. चे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवि चावरे यांनी दिली.
सदर क्रिकेट क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उद्योगातील मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुप्ता, उद्योग प्रमुख अविनाश डोंगरे, मुख्य वित्त अधिकारी हेमराज देशमुख, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, प्रशासन अधिकारी दिपक पराळे, सर्व महाव्यवस्थापक मनीष वडस्कर, महाव्यवस्थापक सतीश मूलकलवार, महाव्यवस्थापक अमरेंद्र सिंह ठाकूर, महाव्यवस्थापक विकास पटेल, कपिल जैन, चेतन चोहिवाल, विजय कनोजे, अभिषेक खुपत यांनी विशेष योगदान दिले. स्पर्धेचे यथोचित समालोचन शुभम तंबोली यांनी केले.
अधिकारी, कर्मचारी व कामगारांमध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेत एकूण ९ संघांनी सहभाग घेतला. यात लॉजिस्टिक टाईगर व रोलिंग मिल वॉरीअर यांच्यात अंतिम सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या या अंतिम लढतीत रोलिंग मिल वॉरीअर विभागाने बाजी मारीत या क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. या स्पर्धेचा मालिकावीर हेमंत पेंदोर त्याच्या अष्टपैलू सुमार खेळीमुळे ठरला.



