Sunday, December 8, 2024
HomeCrimeचंद्रपुरात देशी कट्टा जप्त : चंद्रपूर शहर पोलीसांची कारवाई
spot_img
spot_img

चंद्रपुरात देशी कट्टा जप्त : चंद्रपूर शहर पोलीसांची कारवाई

Country-made gun seized in Chandrapur

Action by Chandrapur city police

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने देशी कट्टा व जिवंत काडतूस विक्री करणाऱ्या युवकाला लालपेठ रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेत देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस असा एकूण 12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विधानसभा निवडणुका 2024 आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चंद्रपुर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि निलेश वाघमारे व अंमलदार पेट्रोलींग करीत असतांना एक इसम लालपेठ रेल्वे स्टेशन वर देसी क‌ट्टा (बंदुक) विक्री करिता फिरत आहे अश्या माहीती वरून पोलीस पथकाने लालपेठ रेल्वे स्टेशन चंद्रपुर येथे पोहोचले असता एक गुलाबी रंगांची टि-शर्ट व काळ्या रंगाचा लोवर घातलेला युवक पोलीसांना पाहुन पळून जातांना दिसला, City Police DB Squad पोलीस स्टॉफने पाठलाग करीत त्याला पकडून ताब्यात घेतले असता ताब्यातून एक गावठी बनावटीचा देशी कटटा व एक जिवंत बुलेट राउंड किंमत एकूण 12000 रुपयांचा वस्तु जप्त करण्यात आले. Chandrapur City Police Station

आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे शस्त्र अधिनियम 1959 कलम 3.25 अन्वने गुन्हा नोंद करण्यात आला. Chandrapur Crime

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, स.पो.नि . पंकज भैसाने यांचे नेतृत्वत गुन्हे शोध पथक प्रमुख स.पो.नी. निलेश वाघमारे, पोऊपनी संदीप पंचहीर, सफो महेंद्र बेसरकर, सचीन बोरकर, संतोष कुमार कणकम , मपोहवा भावना रामटेके, नापोका कपुरचंट खैरवार, रूपेश पराते, इर्शाद खान , शाबाज सय्यद, विकम मेश्राम, खुशाल कावळे, इमरान खान, राहुल चिताडे, दिलीप कुसराम यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular