Friday, February 7, 2025
HomeAcb Trapमोदी साहेब ! महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावा.

मोदी साहेब ! महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावा.

Contribute to the economic situation of Maharashtra

चंद्रपूर :- महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती बिघडली असून महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडला असल्याची चिंता व्यक्त करीत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi व वित्त मंत्री निर्मला सितारमण Nirmala Sitaraman यांना पत्र लिहित महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीला बळकटी आणण्याकरीता आवाहन पत्राद्वारे केले आहे. Contribute to the economic situation of Maharashtra
ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूका पार पडल्या. यावेळी युती सरकार ने अनेक घोषणांचा पाऊस पाडला. परंतु सदर घोषणा अमलात आणण्याकरीता महाराष्ट्र सरकार ने कुठलेही वित्तीय नियोजन न केल्याने अनेक विकासात्मक कामांचे कंत्राटदारांचे देयके, दिव्यांगणांना मिळणारे अनुदान, निराधारा योजनेचे अनुदान, बालसंगोपन योजनेचा निधी तसेच मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याकरीता शासनाने काढलेले परिपत्रक व त्याद्वारे महाविद्यालयाला देण्यात येणारे शुल्क अद्यापही प्रलंबित आहे. याकरीता महाराष्ट्र सरकारला पंतप्रधानाने मदत करावी या करीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देशाचे पंतप्रधान यांना पत्र लिहून महाराष्ट्र सरकार ला आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. MP Pratibha Dhanorkar’s letter to the Prime Minister
त्या आशयाचे पत्र त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमण यांना देखील दिले आहे.
केंद्राने आर्थिक मदत केल्यास महराष्ट्राच्या आर्थिक नियोजनास हातभार लागून सामान्यांचे प्रश्न सुटणार हे मात्र नक्की.
R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular