Friday, March 21, 2025
HomeNationalइन्फंट काँन्व्हेंट येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

इन्फंट काँन्व्हेंट येथे संविधान दिवस उत्साहात साजरा

Constitution Day celebrated with enthusiasm at Infant Convent

चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे २६ नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

संविधान दिवस निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठाचे सादरीकरण केले. Constitution Day celebrated with enthusiasm at Infant Convent

त्यानंतर इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांनी संविधानातील काही ठळक शब्दाचे महत्व समजून दिले आणि इयत्ता 6,7, 8 मधील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे संविधानाचे महत्त्व व संविधानाबाबत जागृतीचे सादरीकरण केले,

तसेच इयत्ता नुसार विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात इयत्ता 1व 2 री साठी संविधान वाचन ,इयत्ता 3 री साठी निबंध लेखन, इयत्ता 4 थी साठी संविधान लेखन, इयत्ता 5 वी साठी संविधान व त्याचा अर्थ सांगणे ,इयत्ता 6 वी साठी संविधान दिवस यावर चित्र काढणे, इयत्ता 7 वी साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र काढणे, वर्ग 8 वी साठी मूलभूत अधिकार याचा चार्ट बनविणे, वर्ग 9 व 10वी साठी राजमुद्रा काढणे व त्याची माहिती सांगणे.अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौऱ भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी आणि शाळेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी माहिरा बांबोळे हिने केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular