Congress will definitely regain its former glory under the leadership of MP Rahul Gandhi
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नेत्रदीपक कामगिरी करून 13 खासदार निवडून आनले मात्र विधानसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. फक्त 16 आमदार निवडून आले.
चंद्रपुरात काँग्रेस चे मोदी सरकार विरोधात आंदोलन

विधानसभा निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्यात यावर विचारमंथन करून भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढवायच्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे, येणारा काळ हा काँग्रेस आणि राहुलजी गांधी यांचा असणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यावे व्यक्ती मोठा नाही, पक्ष संघटना ही सर्वप्रथम आहे. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम पदाधिकारी नेमून जनसामान्यांचे काम करण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात आज अत्यंत निराशाजनक वातावरण आहे. जनतेचे प्रश्न मोठय़ा प्रमाणात उभे आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागेल. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, त्यातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि जिल्ह्यात, राज्यत, देशात काँग्रेस गतवैभव प्राप्त करेल असे प्रतिपादन चंद्रपूर काँग्रेसचे निरिक्षक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अभिजित वंजारी Chandrapur Congress observer MLA Abhijit Vanjari यांनी हाँटेल सिद्धार्थ प्रिमीयर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस आणि चंद्रपूर शहर काँग्रेस च्या वतीने आयोजित बैठकीत केले. Congress will definitely regain its former glory

यावेळी चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसने आपल्या कामाचा आढावा निरीक्षकांसमोर सादर केला. त्यानंतर ते चंद्रपूर शहर तसेच तालुका, शहर तसेच ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्वांची मते जाणून आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत. Review of the work of Chandrapur District and City Congress

आ सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश
