Congress candidate for Ballarpur Assembly should be given to Dr. Abhilasha Gavture
चंद्रपूर :- डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांना बल्लारपूर – पोंभुर्णा – मूल विधानसभा मतदार संघासाठी अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे यांनी जाहीर पाठिंबा घोषित केला.
दुर्गापूर येथे डॉ. अभिलाषाताई गावतुरे मित्र परिवार द्वारा आयोजित महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामवंत लोकशाहीर संभाजी भगत Sambhaji Bhagat यांच्या ‘विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण (बाळूभाऊ) खोब्रागडे म्हणाले की मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने फुले – शाहू – आंबेडकरी चळवळीमध्ये अभिलाषाताई गावतुरे यांचे मोठे योगदान आहे आणि बहुजनांचे प्रतिनिधी विधिमंडळामध्ये जाऊन पुरोगामी चळवळीला बळकटी मिळाली पाहिजे.
पक्षाची बांधिलकी सोडून ज्याप्रमाणे संविधान वाचवण्यासाठी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आंबेडकरी जनतेने साथ सहयोग दिला होता आता सुद्धा ही परिस्थिती तशीच आहे व आंबेडकरी जनतेच्या मनातील इच्छा बल्लारपूर विधानसभेसाठी डॉ. अभिलाषाताई यांना प्रतिनिधित्व देण्याची आहे, म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आंबेडकरी जनतेचा मान राखून डॉ. अभिलाषाताई गावतुरे यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे असा पाठपुरावा सुद्धा केल्याचे त्यांनी सांगितले. Congress candidate for Ballarpur Assembly should be given to Dr. Abhilasha Gavture
विद्रोही शाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही आंबेडकरी गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषाताई गावतुरे यांच्यासह मंचावर बाळू चांदेकर, दीपक कुंदोजवार, नमो शेंडे, संजू भगत, गिरीधर लांबट, देविदास रामटेके, मुन्ना आवळे, सुरेश कावळे, अनिल फाले, डॉ.राजश्री आवळे, दीपक आवळे, मुसा शेख, फिरोज पठाण, आनंद दोरखे, विशाल दुर्योधन, दिगंबर दुर्योधन, अँड.मोटघरे सर, कमलाबाई मुन, रत्नपारखी मॅडम, कौशिक खोब्रागडे, शुभम रायपूरे, आशिष शेंडे, खुशाल कावळे यांची उपस्थिती होती.
डॉ. अभिलाषा गावतुरे मित्रपरिवार चे अध्यक्ष कौशिक खोब्रागडे यांनी याप्रसंगी सर्व मान्यवरांचे व दुर्गापूर येथील जनतेचे आभार मानले.