Congress BLA and workers’ meeting held at Gondpipri
चंद्रपूर :- खैरे कुणबी सभागृह, गोंडपिपरी येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी ओबीसी चळवळीतील सक्रिय समाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक कूडे यांनी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस विचारसरणीवर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्षात त्यांचे स्वागत केले आणि गोंडपिपरी तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. Dr. Ashok Kude joins Congress party
यावेळी आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए यांच्याशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याचे आवाहन केले. Rajura Assembly Election तर उपस्थितांनी कोणत्याही परिस्थितीत आ. सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. Congress BLA and workers’ meeting
यावेळी काँग्रेस नेते माजी सभापती सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र भट्टे, शहराध्यक्ष राजु झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, वासुदेव सातपुते, माजी उपसभापती अशोक रेचनकर, नगरसेवक वनिता वाघाडे, वनिता देवगडे, रंजना रामगीरकर, अजय माडुरवार, नामदेव सांगळे, साईनाथ कोडापे, रेखा रामटेके, नरेंद्र वाघाडे, फिरोज पठाण, विपिन पेदुलवार, संतोष बंडावार, रज्जाक कुरेशी, रफिक शेख, विनोद नागापुरे, बालाजी चनकापुरे, गौतम झाडे, सचिन चिंतावार, रवी साखलवार, प्रवीण नरहरशेट्टीवार, सुनील संकुलवार, विनोद जगताप, शैलेश बैस, अनिल झाडे, पांडुजी कोहपरे, सचिन फुलझेले, नितेश मेश्राम, शालिक झाडे, माधुरी येलेकर, प्रकाश हिवरकर, अनिल कोरडे, महेंद्र कुनघाडकर, राजु राऊत, संजय झाडे, विलास कोहपरे, शिनु कंदनुरीवार, शोभा देवाडे यासह तालुका, शहर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए. आवर्जुन उपस्थित होते.