Friday, January 17, 2025
HomeEducationalविद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच समाजभान जपावे - मधुकर डांगे

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच समाजभान जपावे – मधुकर डांगे

Students should maintain social awareness along with studies – Madhukar Dange

चंद्रपूर :- राजुरा येथील जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्य आयोजित कार्यक्रमात बोलताना वाचनालयाचे संचालक मधुकर डांगे यांनी प्रतिपादन केले. त्यांनी भाषणामध्ये वाचनालयातील जे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून नोकरीवर लागले त्यांच्या सत्कारा निमित्य मार्गदर्शन करताना वाचनालय सुरू करण्यामागचा उद्देश आणि वाचनालयातून अभ्यास करून जे विद्यार्थी विविध क्षेत्रातल्या नोकरीवर लागतात त्यांनी पुढेही आपला अभ्यास सुरूच ठेवावा, त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या वाचनालयाकडे लक्ष द्यावे आणि आपल्या बांधवांना मदत करावी. Students should maintain social awareness along with studies

वाचनालयाची सुरुवात मराठा सेवा संघाच्या Maratha Seva Sangh विचारधारेतून करण्यात आली. “गाव तेथे वाचनालय” ही मराठा सेवा संघाची विचारधारा असून प्रत्येक वाचनालयातून असे विद्यार्थी देशाचे भावी अधिकारी व आदर्श नागरिक घडावे असा या वाचनालयाच्या स्थापने मागचा उद्देश आहे.

आजपर्यंत वाचनालयातील शंभराच्या वर विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवून नोकरी मिळवलेली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून आपल्या आई-वडिलांच्या नावासोबतच वाचनालयाचे नाव सुद्धा मोठे करावे अशी आमची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमात वाचनालयातील मयूर मोहूर्ले हा कृषी विभागात कृषी सहाय्यक, कार्तिक मोहूर्ले हा भारतीय सेनेमध्ये तर भारत ढुमणे हा सुद्धा भारतीय सेनेमध्ये नियुक्त झालेला आहे, विशेष म्हणजे तीनही विद्यार्थी ग्रामीण भागातील असून अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. दत्तात्रय मोरे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे उपाध्यक्ष विजयभाऊ मोरे, लक्ष्मणराव तुराणकर आणि मार्गदर्शक म्हणून मधुकररावजी डांगे हे होते.

सत्कार समारंभाला उत्तर देताना नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणातून मोरे सरांनी वाचनालयामध्ये अभ्यासासोबतच विविध महापुरुष संतांची चरित्र सुद्धा अभ्यासली पाहिजे, त्याचा आपल्या जीवनामध्ये सामाजिक नैतिकता, कौटुंबिक मूल्य आणि समाजात कसे वागावे यासाठी सर्वांना उपयोगी पडतील आणि आपला इतिहासही माहीत होईल म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत महापुरुषांची चरित्रे अभ्यासावी, वाचनालयात शिस्त पाळावी आणि आपल्या जीवनाची प्रगती साध्य करून घ्यावी असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक संभाजी साळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी वाचनालयाची ग्रंथपाल सुमलता आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular