Monday, May 25, 2026
HomeBussinessआयुक्त पालीवाल यांच्या 'टेंडर टेररिझम' ने मनपाला कोट्यावधीचा फटका

आयुक्त पालीवाल यांच्या ‘टेंडर टेररिझम’ ने मनपाला कोट्यावधीचा फटका

Commissioner Paliwal’s ‘Tender Terror’ Inflicts Multi-Crore Loss on Municipal Corporation

चंद्रपूर :- मनपाचे यापूर्वीचे आयुक्त विपिन पालीवाल यांनी पद व अधिकाराचा दुरुपयोग करून कंत्राटदारांमध्ये दहशत निर्माण केली आणि मर्जीतील कंत्राटदारांना चढ्या दराने कामे दिल्याचा गंभीर आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक पप्पू देशमुख यांनी 27 मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती व अर्थसंकल्पीय सभेत केला. पालीवाल यांच्या या ‘टेंडर टेररिझम’ची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली. विरोधी व सत्ताधारी नगरसेवकांनीही या मागणीला पाठिंबा दिला. त्यानुसार सभापती मनस्वी गिऱ्हे व महापौर संगीता खांडेकर यांनी पालीवाल यांच्या कारकीर्दीतील सर्व वादग्रस्त कामांची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अकनुरी नरेश यांना दिले. Commissioner Paliwal’s ‘Tender Terror’ Inflicts Multi-Crore Loss

चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेल व गॅसचा मुबलक साठा…

काय आहे टेंडर टेररिझम?

निविदा प्रक्रियेत मर्जीतील कंत्राटदारांच्या सोयीने अटी-शर्ती घालणे, इतर इच्छुक कंत्राटदारांवर दबाव टाकून त्यांना स्पर्धेतून बाहेर काढणे, पात्र असूनही हेतुपुरस्सर अपात्र ठरवणे, मुदत संपल्यानंतरही मर्जीतील कंत्राटदारांना वारंवार मुदतवाढ देणे आणि अंदाजपत्रकापेक्षा जादा कामे देणे — असे गंभीर गैरप्रकार पालीवाल यांनी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

आमदार चषक 2026 – भव्य कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ….

वादग्रस्त कामांची यादी

बागला चौक रस्ता दुभाजक, शहरातील फाउंटेन उभारणी, वाहन पुरवठा, नाली सफाई, एलईडी स्क्रीन, पाणीपुरवठा योजना, गार्डन मेंटेनन्स तसेच मे. लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला दिलेले सुमारे 500 कोटी रुपयांचे भूमिगत गटार योजनेचे काम यांसह अनेक वादग्रस्त कामातील गैरप्रकारचे पुरावे उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी स्थायी समिती व अर्थसंकल्पीय सभेत नमूद केले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular