Saturday, January 18, 2025
HomeCrimeखुनाचा प्रयत्न करणाऱ्याला अवघ्या तासात अटक

खुनाचा प्रयत्न करणाऱ्याला अवघ्या तासात अटक

Chandrapur City police arrested the accused of attempted murder in just an hour

चंद्रपूर :- एका तरुणावर जीवघेण्या हल्ला करणाऱ्या आरोपीला एका तासाच्या आत अटक करीत गंभीर अवस्थेत रक्तबंबाळ असलेल्या युवकाला पोलिसांनी पोलीस वाहनात रुग्णालयात दाखल करत चंद्रपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पाथकाने तत्परता दाखवली. Chandrapur City police arrested the accused of attempted murder

चंद्रपुर शहर पोलीसांना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी गळयाला मार लागलेला एक इसम रक्तबंबाळ अवस्थेत बागला चौक परीसरात बेहोश पडला आहे, या माहीतीवरून लगेच पोलीस सदर ठीकाणी पोहचुन रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलीस वाहनात जखमीस उपचाराकरीता सामान्य रूग्णालय चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले. Chandrapur Crime
पोलिसांनी जखमीला विचारपूस केली असता सांगीतले कि त्याला पैशाच्या वादावरून गळयावर सर्जीकल ब्लेड ने मारले आहे, दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर चे गुन्हे शोध पथक चे प्रमुख सपोनी निलेश वाघमारे व पथक तात्काळ रवाना होवुन मारेकरी आकाश उर्फ चिरा याचा शोध सुरू केला असता एका तासाच्या आत मारेकऱ्याला गौतम नगर येथे एका झोपडीतुन ताब्यात घेतले आणि त्याचेजवळील सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आले.

जखमी संदीप चौधरी (28 वर्ष) रा. महावीर नगर चंद्रपुर याचे मामा यांचे तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम 109 भारतीय न्याय संहीता (307 भांदवि) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी महेश इटकल पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शण, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वात स.पो.नी. निलेश वाघमारे, पोउपनी संदीप बच्छीरे, सफौ. महेंद्र बेसरकर, पोहवा सचीन बोरकर, संतोष कनकम, मपोहवा भावना रामटेके, नापोका कपुरचंद, ईम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, ईर्शाद खान, रूपेश रणदिवे, शाहबाज अली, खुशाल कवले, विक्रम मेश्राम यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular