Bjp Suspension action against Brijbhushan Pazare
चंद्रपूर :- बंडखोरी करून भाजपा-महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे Bjp State President भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांच्याकडून स्पष्ट सूचना होत्या. मात्र, चंद्रपूर आणि वरोरा येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा आदेश ऐकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. Assembly Election
चंद्रपूर चे Brijbhushan Pazare ब्रिजभूषण पाझारे, वरोरा येथील राजू गायकवाड, अहतेशाम अली यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजपा-महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीत उभे राहिल्याबद्दल त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांना निलंबनाचे पत्र दिले आहे. Bjp Suspension action against Brijbhushan Pazare
आपण विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये चंद्रपूर आणि वरोरा विधानसभा मतदासंघातील भाजपा- महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. ही बंडखोरी पक्षाच्या विरोधात असल्याने आपणास पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे’, असे पत्र जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.