Thursday, April 16, 2026
HomeCrimeघरफोडी प्रकरणात पोलीसांची अव्वल कामगिरी

घरफोडी प्रकरणात पोलीसांची अव्वल कामगिरी

Chandrapur police’s top performance in burglary case

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चिमूर शहरातील प्रगती नगर येथील एका घरफोडी प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपीला अटक करत ७ दिवसांत ३८ तोळ्यांपेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 33,89,306 रुपये परत मिळवून दिले. या उत्कृष्ट पोलिसी तपास कार्यामुळे नागरिकांत समाधान आणि पोलीस दलाबाबत विश्वास निर्माण झाला आहे. Chandrapur police’s top performance in burglary case

दिनांक ११ जुलै २०२५ रोजी सौ. कल्पना मुर्लीधर गोन्नाडे (वय ४६) यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांनी सांगितले की, ६ जुलै ते ११ जुलै दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून तब्बल ३८ तोळे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते.

या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. केवळ ४८ तासांत आरोपीस अटक करून संपूर्ण चोरीतील सोन्याची चपलाकंठी, पोत, बांगड्या, गोप, पाटल्या, टॉप्स, अंगठ्या, नथ, गळसोरीसह एकूण १३ प्रकारचे दागिने तसेच रोख रक्कम 11,600 रुपये असा एकूण किंमत: 33,89,306 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Crime News

दिनांक १९ जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चिमूर येथे पंचासमक्ष मुद्देमाल फिर्यादी कल्पना गोन्नाडे यांना परत करण्यात आला. Accused arrested within 48 hours, 38 tolas of gold recovered

कर्तव्यपूर्ती आणि नागरिकांचा विश्वास

पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या हस्ते संपुर्ण मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. फिर्यादीच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य तर पोलीसांच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचं समाधान दिसून आलं. Chandrapur Police

या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांनी भरभरून कौतुक केले असून, चोरट्यांपासून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याबाबत पोलीस दलाची कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular