Kisan Nagarkar honored with ‘Best Technician’ award at the national level
चंद्रपूर :- वीज क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात चंद्रपूर जिल्ह्यातील किसन दामोधर नागरकर यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट टेक्निशियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय केंद्रीय विद्युत प्राधिकरण, Tata Power Delhi Distribution Limited तसेच देशातील विविध वितरण, जनरेशन आणि ट्रान्समिशन कंपन्यांच्या सहकार्याने ७ मार्च २०२६ रोजी India Habitat Centre येथील ‘द स्टीन ऑडिटोरियम’मध्ये “लाईनमन डे” Lineman Day च्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील लाईनमन, टेक्निशियन आणि वीज क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या धाडसी व समर्पित सेवेला सलाम करत त्यांचा गौरव करण्यात आला.
या भव्य कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील किसन दामोधर नागरकर यांना त्यांच्या उत्कृष्ट व धाडसी सेवाकार्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट टेक्निशियन’ पुरस्कार देऊन केंद्रीय विद्युत मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि धाडसाने सेवा बजावणाऱ्या नागरकर यांच्या कार्याची यापूर्वीही अनेकदा दखल घेण्यात आली आहे. याआधी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नाते-आपुलकीचे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष ताजने, सचिव प्रा. प्रमोद उरकुडे, सल्लागार उमेश पारखी तसेच सदस्य किशोर तुराणकर, राजेश पहापळे, मनोहर डवरे, महेश गुंजेकर, गणेश पाचभाई, हितेश गोहोकार आणि विदर्भातील मित्रपरिवाराने श्री. नागरकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.