Saturday, January 24, 2026
HomeCrimeपोलीसांवर हल्ला, एकाचा मृत्यू एक जखमी

पोलीसांवर हल्ला, एकाचा मृत्यू एक जखमी

Attack on police, one policeman killed and one injured

चंद्रपूर हादरले
पोलीसांवर हल्ला, एकाचा मृत्यू एक जखमी

चंद्रपूर :- चंद्रपुरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच असून गुन्हेगारी जगतात पोलीसांचा जरब कमी होतांना दिसत आहे. अशातच चक्क पोलीसांवर हल्ला करीत हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात घडली. याघटनेने चंद्रपूर शहर हादरले.

शहरातील पठानपुरा मार्गांवरील पिंक बार अँड रेस्टॉरंट येथे दिनांक 7 मार्च रोजी रात्रो 9 वाजताच्या दरम्यान काही मद्यपी दारू पित असतांना पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण व संदिप चाफले आपली ड्युटी संपवून बार मध्ये आले असता मद्यपी मोठया आवाजात बोलत असल्याने पोलीस कर्मचारी यांनी हळू बोला असे समजावले या शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली यांचे रूपांतर वादात झाले आरोपीना नशेत आपल्या 4-5 सहकाऱ्यांना फोन करून बोलविले आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

दिलीप चव्हाण यांना रुग्णालयात हलवीत असतांना वाटेतच मृत्यू झाला तर दुसरे पोलीस कर्मचारी संदिप चाफले यांना सामान्य रुग्णालयातून खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले.

या घटनेने चंद्रपूर शहर हादरले, शहर पोलिसांना बातमी कळताच पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी आकाश शिर्के, मल्लिक व इतर 5 आरोपीना अटक करण्यात आली तर पिंक बार चे संचालक बनकर यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular