चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाऊंडेशन, नागपूर व गोविंद मैना फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह. चंद्रपूर येथे सन्मान कर्तृत्वाचा ‘उत्कृष्ठ शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आलेला आहे. Outstanding Teacher Award Ceremony’ in Chandrapur
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, उद्घाटक म्हणून आमदार ॲड. अभिजीत वंजारी, प्रमुख अतिथी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांची मंचावर उपस्थिती राहणार आहे.
या सन्मान सोहळ्यात चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य व संस्था चालकांचा सन्मान येणार आहे. तसेच माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे व डॉ. बबनराव तायवाडे यांना ‘जीवनगौरव सन्मान २०२६’ने गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्यास शिक्षकवृंद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाऊंडेशन, नागपूर व गोविंद मैना फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
