Friday, April 17, 2026
HomeHealthजागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा

World Pharmacist Day celebrated with enthusiasm in Chandrapur

चंद्रपूर :- 25 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन चंद्रपूर येथील वन अकॅडमि (रेंजर कॉलेज) येथे मोठया हर्ष उल्हासत साजरा करण्यात आला. World Pharmacist Day

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पुष्पहास बल्लाळ सर माजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषधं प्रशासन. नागपूर. हे आले होते. तसेच त्यांच्या सोबत चेतन मारवाह (मोटिवेशनल स्पीकर) हे सुद्धा होते.

या कार्यक्रमाचे प्रस्थाविक फार्मासिस्ट फोरम चे अध्यक्ष गणेश झाडे यांनी केले.

या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हातील सहा फार्मसी कॉलेज नि सहभाग घेतला.. त्यात 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्सपुर्थ सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमात गेल्या सहा दिवसा पासून वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्यात यात बुद्धीबळ स्पर्धा, बॉक्स क्रिकेट स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, सामूहिक नृत्य स्पर्धा व गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.

हा कार्यक्रम यादस्वी करण्यासाठी सचिव पंकज देशमुख, सहसचिव तुषार सांबरे सर, सागर मंडल, सचिन खोब्रागडे यांनी खुप मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्रीकांत रेशीमवाले यांनी मानले. तसेच या क्रमाला सी डी सि डी ए. चे अध्यक्ष बंटी घाटे, उत्तरवार, कुंदन, धमादीप रामटेके फोरम चे सर्व पदाधिकारी बहुसंख्या फार्मासिस्ट उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन कोमल बोरकर यांनी केले

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular