Thursday, August 20, 2026
HomeMaharashtraआंतरराष्ट्रीय हेन्री ड्युनांट पदकासाठी प्रितम राजाभोज नामांकित

आंतरराष्ट्रीय हेन्री ड्युनांट पदकासाठी प्रितम राजाभोज नामांकित

भंडारा :- ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा. ना. श्रीमती माधुरी सतीश मिसाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उत्कृष्ट सामाजिक सेवा करणारे रक्तवीर व सामाजिक कार्यकर्ते प्रितमकुमार रामरतन राजाभोज, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, भंडारा, यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. Pritam Rajabhoj nominated for the International Henry Dunant Medal

प्रितम राजाभोज यांची आंतरराष्ट्रीय हेन्री ड्युनांट मेडल, जिनिव्हा, स्वित्झर्लंड – २०२६ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातून या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मानासाठी नामांकन होणे ही संपूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

या प्रसंगी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार, IAS, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद साडवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चौहान, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, भंडारा पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, नगराध्यक्ष मधुरा मदनकर, आशु गोंडाणे यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.

प्रितम राजाभोज यांच्या सामाजिक सेवा, रक्तदान आणि जनसेवेच्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा गौरव झाल्याने भंडारा जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“तुमच्या भागातील बातम्या, घडामोडी, घटना, समस्या आम्हाला WhatsApp करा, प्रकाशित करू” 8766574311

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular