चंद्रपूर :- इन्फंट जिजस हायस्कूल, राजुरा स्टेट विभागातील इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी राजुरा नगरपरिषदेला शैक्षणिक भेट देत नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांना नागरी प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. Students gain firsthand insight into the Municipal Council’s operations महा वॉकथॉन – वॉक फॉर वॉटर चे उद्या आयोजन…..
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी नगरपरिषदेची प्रशासकीय रचना, विविध विभागांचे कार्य, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा तसेच शहराच्या विकासामध्ये नगरपरिषदेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती घेतली. विविध विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. Infant School students pay an educational visit to Rajura Municipal Council महिला होणार कारपेंटर…….
नगरपरिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, कर विभाग, अकाऊंट विभाग, आस्थापना विभाग, महिला व बालकल्याण विभाग, DAY-NULM, शिक्षण विभाग, वीज विभाग, नगररचना विभाग, कॉम्प्युटर विभाग तसेच सिटी क्लिननेस आदी विभागांच्या कामकाजाची विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. बालकांच्या क्षेत्रात काम करतांना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची -पोलीस अधीक्षक
या वेळी अधिकारी शेषराव वानखेडे, सुमित खापर्डे, अपेक्षा श्रीकोंडवार, मनोज कुंभारे, संदीप वानखेडे, सुरेखा पटेल, घरोटे, बंडू ताजने, उमेश पेंडाम, अमित गावित, प्रीतम खडसे, दीपशिखा प्रसाद, विरेंद्र धोटे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध विभागांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. राजीव गांधींच्या दूरदृष्टीमुळे देशात तंत्रज्ञान क्रांती…….
शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भांगू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इयत्ता ९ वीच्या वर्गशिक्षिका सौ. सोनाली कलुरवार, इयत्ता १० वीच्या वर्गशिक्षिका मेघा धोटे तसेच शाबाज सर विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते.
मुख्याधिकारी प्रज्ञाशील वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमने या शैक्षणिक भेटीस विशेष सहकार्य केले.
शैक्षणिक अभ्यासक्रमातील विषयांना प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. नगरपरिषदेचे दैनंदिन कामकाज, नागरिकांच्या समस्या सोडविण्याची प्रक्रिया आणि शहराच्या विकासासाठी विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती मिळाल्याने ही भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व उपयुक्त ठरली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध शैक्षणिक व अनुभवाधारित उपक्रम नियमितपणे राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचे विद्यार्थी व शिक्षकांनी कौतुक केले.