Thursday, August 20, 2026
HomeBussinessमहिला होणार ‘कारपेंटर...

महिला होणार ‘कारपेंटर…

चंद्रपूर :- महिलांना पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे जाऊन कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळ (एफडीसीएम), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर शहरातील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी सागवान लाकडापासून विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. Women to Become Carpenters, New Employment Opportunity बालकांच्या क्षेत्रात काम करतांना संवेदनशीलता अत्यंत महत्त्वाची -पोलीस अधीक्षक

खुशिया लोकसंचालित साधन केंद्र, चंद्रपूरच्या माध्यमातून आयोजित या प्रशिक्षणाचा शुभारंभ 19 ऑगस्ट रोजी एफडीसीएमचे सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक रुपेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी संभाजी कोंडेवार तसेच खुशिया लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक शारदा हुसे उपस्थित होत्या. राजीव गांधींच्या दूरदृष्टीमुळे देशात तंत्रज्ञान क्रांती……

या प्रशिक्षणात 35 महिलांनी सहभाग नोंदविला असून प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे. प्रशिक्षणादरम्यान महिलांना सागवान लाकडापासून विविध उपयुक्त वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्रत्यक्ष प्रशिक्षणातून शिकविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षित महिलांना एफडीसीएमच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महिला बचत गटांना केवळ बचत आणि कर्जपुरते मर्यादित न ठेवता त्यांना कौशल्य, उत्पादन आणि रोजगाराशी जोडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिकरीत्या पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सुतारकामात महिलांना प्रशिक्षित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्याच्या दिशेने माविम व एफडीसीएमने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular