Sunday, August 9, 2026
HomeAccidentअल्पवयीन मुलांना वाहन देता सावधान

अल्पवयीन मुलांना वाहन देता सावधान

चंद्रपूर :- अल्पवयीन मुलांकडून दुचाकी व इतर वाहने चालविण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी धडक मोहीम राबविली आहे. अल्पवयीन व विना परवाना वाहन चालविणाऱ्यां विरोधात वाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने विशेष कारवाई करण्यात आली.

शाळा, कोचिंग क्लासेस तसेच बाजार परिसरात ७ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांकडून अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्याबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. Vehicles driven by minors

या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूरने ५२ अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करून ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून २२३ अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून २ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण २७५ वाहनधारकांवर कारवाई करून २ लाख ८२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. Chandrapur Traffic Police

पालकांनाही पोलिसांचा इशारा
“अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे धोकादायक ठरू शकते. स्टंटबाजी किंवा बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे अपघात होऊन स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे” असेही आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांकडून यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबवून अल्पवयीन व विना परवाना वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular