Sunday, August 9, 2026
HomeEducationalकमलादेवी शिक्षण महाविद्यालयात ‘कृती संशोधन’ कार्यशाळा साजरी

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात ‘कृती संशोधन’ कार्यशाळा साजरी

चंद्रपूर : सर्वोदया महिला मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित बालाजी वॉर्ड येथील कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात ‘कृती संशोधन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. Action Research’ Workshop at Kamaladevi College of Education

हेही वाचा <> अल्पवयीन मुलांना वाहन देता.., 223 जणांवर कारवाई

संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलजी बजाज आणि सचिव मा. भरतजी बजाज यांच्या परवानगीने कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉ. राजेश एस. पत्तिवार, जनता कॉलेज ऑफ एज्युकेशन, चंद्रपूर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेत मार्गदर्शक डॉ. राजेश एस. पत्तिवार यांनी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्गातील अध्यापनादरम्यान निर्माण होणाऱ्या विविध शैक्षणिक समस्यांची ओळख करून देत, त्या समस्यांवर कृती संशोधनाच्या माध्यमातून उपाय कसा शोधता येतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संशोधन करताना कोणकोणत्या घटकांचा आणि साधनांचा वापर करावा, संशोधन कार्याची योग्य पद्धत काय असावी, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी कृती संशोधनाचा विषय कसा निवडावा, त्यासाठी विविध कार्यक्षेत्रे कोणती आहेत, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कृती संशोधन कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे यांनी बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत येणाऱ्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी कृती संशोधन अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत असल्याने शिक्षकांनी विविध तंत्रज्ञान व साधनांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. केवळ अध्यापनाचे ज्ञान असणे पुरेसे नसून वर्गातील समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडविण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी कृती संशोधनाची गरज महत्त्वपूर्ण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजकुमार भगत यांनी केले. सूत्रसंचालन बी.एड. द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका प्रगती फुलकर यांनी केले, तर आभार नंदिनी उमाटे यांनी मानले.

कार्यशाळेला प्राध्यापिका सुविधा खोब्रागडे, अश्विनी सातपुडे, डॉ. जयमाला घाटे, डॉ. प्रगती बच्छावार, वनिता हल्करे, शर्मिना अली यांच्यासह ग्रंथपाल चंदन जगताप, शिक्षकेतर कर्मचारी मोरेश्वर गाडगे, विजय बाळकुडे तसेच बी.एड. द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular