Tuesday, June 30, 2026
HomeEducationalइन्फंट काँन्व्हेंट येथे प्रवेशोत्सवाद्वारे नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

इन्फंट काँन्व्हेंट येथे प्रवेशोत्सवाद्वारे नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

New academic year begins at Infant Convent with an induction ceremony

चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी, राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस हायस्कूल येथे पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भव्य व आकर्षक स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. उत्साह, आनंद आणि रंगतदार वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात संस्मरणीय ठरली. New academic year begins at Infant Convent

उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू……..

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित सुभाषराव धोटे यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांंचे विशेष स्वागत करून त्यांना पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरातील नव्याने विकसित करण्यात आलेल्या आकर्षक आणि विविध सुविधायुक्त बगीच्याचे उद्घाटन सुद्धा पार पडले. या बगीच्यात विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त फेरफटका मारत आनंद लुटला. निसर्गरम्य वातावरणामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बालगुन्हेगारी कायदे अधिक कठोर करा……

यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते मिकी, कॅट, पांडा आणि टेडीबिअर या लोकप्रिय कार्टून पात्रांची असलेली उपस्थिती आणि त्यांची चिमुकल्या विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद. या पात्रांनी विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत करून लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. विद्यार्थ्यांनी कार्टून पात्रांसोबत मनमुराद आनंद घेत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला. वीज कंत्राटदाराचा बेमुदत काम बंद इशारा

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अभिजित धोटे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शाळेतील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहितीही दिली.

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापक रफीक अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी इरकी यांनी तर आभार प्रदर्शन निता जक्कनवार यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा स्वागत समारंभ संस्मरणीय ठरला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular