Congress Submits Memorandum to District Collector Regarding Fuel Price Hikes, OBC Census, and NEET Scam
चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना विविध जनहितार्थ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून जीवनावश्यक वस्तूंचे दरही मोठ्या प्रमाणात वाढल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. Fuel Price Hikes, OBC Census, and NEET Scam
निवेदनात म्हटले आहे की, सलग होत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गावर होत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीपूर्व तयारीत व्यस्त असताना डिझेल व खतांच्या टंचाईमुळे त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. प्राणी क्रूरता रोखा… जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…..
यावेळी ओबीसी जनगणनेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. केंद्र सरकारने संसदेत ओबीसी जनगणनेचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने त्यांची गणना ‘इतर’ प्रवर्गात केली जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. Maharashtra State Congress Committee, OBC Department मोबाईलवर एक्स्ट्रीम अलर्ट……..
तसेच नुकत्याच पार पडलेल्या NEET परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या प्रकारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले असून अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच पुढील परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. रुग्णांच्या सेवेसाठी खासदार धानोरकरांची धडक…..
सदर निवेदन सादर करतांना उमाकांत धांडे, दत्तात्रय समर्थ, अतुल पिंपळकर, चेतन कामडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 22 वर्षानंतर पुन्हा रंगल्या मैत्रीच्या आठवणी……
मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.