Bhavanjibhai Chavan High School’s Class of 2004 Reunion Concludes Enthusiastically
चंद्रपूर : भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या 2004 बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा बहुप्रतीक्षित स्नेहमेळावा दिनांक 23 मे 2026 रोजी अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत बालपणातील क्षण पुन्हा अनुभवले. Bhavanjibhai Chavan High School’s Class of 2004 Reunion मोबाईलवर एक्स्ट्रीम अलर्ट……..
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षारोपण उपक्रमाने करण्यात आली. संस्थेचे सचिव मा. श्री. लक्ष्मणराव धोबे तसेच उपस्थित मान्यवर शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. “झाडे लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत स्नेहमेळाव्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली. प्राणी क्रूरता रोखा… जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…..
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वर्षा गोरे धवणे यांनी केले, तर प्रास्ताविक सोनल ढेंगळे यांनी सादर केले. यावेळी सुभाष साव यांनी आपल्या मनोगतातून स्नेहमेळाव्याच्या आयोजनामागील भावना व्यक्त करत उपस्थितांना भावूक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव लक्ष्मणराव धोबे होते. Memories of Friendship Rekindled After 22 Years शासकीय रुग्णालयातील व्यवस्था सुधारल्या…….

यावेळी संस्थेचे सदस्य विजयराव टोंगे सर, शाळेचे प्राचार्य जयंतराव टोंगे सर तसेच माजी वर्गशिक्षक ढूमणे सर, तनिरवार सर, महेशकर सर, गावंडे मॅडम, जेणेकर मॅडम, विठ्ठलराव खोकले सर, किशोर उईके सर, जोगी सर आणि रोडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, संस्कार आणि मैत्रीचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव कथन करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झाले.
संपूर्ण कार्यक्रमात मैत्री, स्नेह, हास्यविनोद आणि आठवणींचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विविध उपक्रम आणि संवादांनी भरलेला हा स्नेहमेळावा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक व शैक्षणिक जाणीवेतून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत नामांकित कंपनीचा मोठा स्पीकर आणि माईक भेट स्वरूपात प्रदान केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अमित पोडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमित पोडे, सोनल ढेंगळे, निलेश काळे, प्रेम उपरे, राज मुळेवार, जयश्री डाहूले, संकेत जयकर आणि सुभाष साव यांनी विशेष परिश्रम घेतले. यांच्या नियोजनबद्ध आणि अथक प्रयत्नांमुळे स्नेहमेळावा अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
भारतीय राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या मैत्रीच्या नात्यांना नवसंजीवनी मिळाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.