Wednesday, May 27, 2026
HomeCrimeएलसीबीची धडक - जबरी चोरीचा पर्दाफाश

एलसीबीची धडक – जबरी चोरीचा पर्दाफाश

LCB Strikes; Robbery Case Cracked in Gondpipri

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांच्या संयुक्त पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत सराईत आरोपीला अटक केली असून, चोरीतील मुद्देमालासह वाहन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Decisive Action by LCB and Gondpipri Police इंधन दरवाढ, नीट पेपर घोटाळा आणि ओबीसी जनगणना……..

पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुन्हा क्रमांक २३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३१५, १२६(२) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंडपिपरी पोलिसांकडून सुरू होता. मोबाईलवर एक्स्ट्रीम अलर्ट……..

तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर सराईत गुन्हेगार सचिन उर्फ बाबासाहेब संतोष नगराळे (रा. राजुरा, जि. चंद्रपूर) यास ताब्यात घेण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसून चौकशी केली असता आरोपीने गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ जबरी चोरी केल्याची कबुली दिली. Case Solved, Hardened Criminal Apprehended प्राणी क्रूरता रोखा… जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश…..

आरोपीच्या कबुलीजबाबानुसार पोलिसांनी चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोपेड अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी गोंडपिपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 22 वर्षानंतर पुन्हा रंगल्या मैत्रीच्या आठवणी……..

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीमोटे, पोउपनि संतोष निंभोरकर, विनोद भुरले, मंगेश कराडे यांच्यासह सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र मंहतो, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार, विलास कोवे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल गारघाटे, सुमित बरडे, सुशील गोंगले, आकाश गुंजकर, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस स्टेशन गोंडपिपरी व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular