Thursday, May 21, 2026
HomeCrimeरामनगर हद्दीतील ३ गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने केले उघड

रामनगर हद्दीतील ३ गुन्हे स्थानिक गुन्हे शाखेने केले उघड

Local Crime Branch has solved three cases within the areas of Ramnagar

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील दोन मोटारसायकल चोरी व एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला पुढील तपासासाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. LCB has solved 3 cases in Ramnagar Police Station area

या प्रकरणात पोलिसांनी गोपाल जीवन मालाकर (वय २६, रा. शाम नगर, चंद्रपूर) याला अटक केली आहे. आरोपीकडून दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकली (क्रमांक MH 34 AS 5035 व MH 31 BJ 3628) तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात पोलीस स्टेशन रामनगर येथील खालील गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये अपराध क्रमांक ६५०/२६ व ६७२/२६ कलम ३०३ (२) बीएनएस अंतर्गत नोंद मोटारसायकल चोरीचे गुन्हे तसेच अपराध क्रमांक ६५१/२६ कलम ३०५, ३३१ (४) बीएनएस अंतर्गत घरफोडीचा गुन्हा समाविष्ट आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार तसेच पोलीस अंमलदार सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व हिरालाल गुप्ता यांनी केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular